कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचा हार्ट अटॅकने मृत्यू!

बंगळुरु: कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांचा बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयात उपचार सुरु होता. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सकाळी ११:३० वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरुन अभिनेता राजकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुनीत राजकुमारचा जीव वाचावा म्हणून डॉक्टर प्रयत्नांची पराकष्ठा करत होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली आणि अखेर बंगळुरुच्या विक्रम रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पुनीत राजकुमार हा ४६ वर्षांचा होता. तो ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होता. पुनीतने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. १९८५ मध्ये तो ‘बेट्टाडा होवू’ चित्रपटात दिसला होता. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. यासोबतच त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. ‘सुवरत्थान’ या चित्रपटात ते अखेरचे दिसले होते.

Leave Your Comment