उर्फी जावेद नेहमीच तिच्या फॅशन सेन्स (Urfi Javed Fashion sense) आणि हटके आउटफिटमुळे चर्चेत असतो. उर्फी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर दररोज नवीन पोस्ट करत असते. आपल्या फॅशनमुळे चर्चेत असलेली उर्फी सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलही झाली आहे. मात्र, आता उर्फी चर्चेत आली आहे ते तिच्या नव्या व्हिडीओमुळे! सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची लगबग आहे. यात सेलिब्रेटी देखील बाप्पाच्या भक्तीत रममाण झाले आहेत. उर्फी जावेद या व्हिडीओ गणपती बाप्पाचे गुणगाण गाताना दिसली आहे.
उर्फीने स्वतःचा एक व्हिडीओ (Urfi Javed Instagram) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फी गणेश भक्तीत तल्लीन झालेली पाहायला मिळाली. हटके फॅशनमुळे अनेकदा टीकेची धनी होत असलेल्या उर्फीचा हा लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना उर्फीने (Urfi Javed) कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गणपती बाप्पा मोरया. इंडियन आयडॉलसाठी ही माझी ऑडिशन नाही. त्यामुळे ज्यांना जज व्हायचे आहे, त्यांनी कोर्टात जावे. मी फार चांगले गाऊ शकत नाही आणि मला ते माहित आहे.’
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद एथनिक लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. इतकच नाही, तर ती गायक शंकर महादेवन यांनी गायलेली गणेश वंदना देखील म्हणताना दिसत आहे. उर्फी जावेदची ही भक्तीमय शैली सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.