TOD Marathi

मुंबई:

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor celebrating Ganpati Festival) गणेशोत्सवासाठी नेमही खास सुट्टी घेत असते. चित्रीकरणात कितीही व्यग्र असली, तरी ती या काळात उत्सवाचा आनंद घेण्यासाठी घरी राहणं पसंत करते. यंदाही श्रद्धा कपूरनं गणेशोत्सव सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

नऊवारी साडी नेसून तिनं उत्सवात भाग घेतला. गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यावर श्रद्धानं छान उकडीच्या मोदकांवर तावही मारला. त्यासोबत तिनं एक खास पोस्टही लिहिली आहे. (Shraddha Kapoor Mumbai)

श्रद्धा म्हणते, ‘हे माझे वर्षभरातले सर्वांत आवडीचे दहा दिवस आहेत. बाप्पाचं माझ्या हृदयात खास असं स्थान आहे. बाप्पा म्हणजे जवळचा मित्रच, तो आपल्या सगळ्या समस्यांचं हरण करून प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीनं करतो. लहानपणापासून हा उत्सव आणि त्याच्या खूप आठवणी आहेत. आम्ही सगळी भावंडं आरतीसाठी एकत्र असायचो.

माझी आजी मला पहिला मोदक द्यायची आणि ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असायची. यंदा आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहोत. माझी मावशी तेजस्विनी कोल्हापूरे यांनी सुचविल्यानुसार आम्ही या पद्धतीनं उत्सव साजरा करतोय. माझ्यासाठी हे दहा दिवस नेहमीच आठवणींचा ठेवा असतो.’ असंही श्रद्धा कपूर म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)