टिओडी मराठी, पुणे, दि. 21 मे 2021 – तौक्ते चक्रीवादळ धडकल्यानंतर मान्सूनची प्रतीक्षा लागली होती. त्यानुसार मान्सून यंदा 21 मे रोजी अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे.
हवामान विभागाने दिलेली माहिती अशी, 21 जून रोजी नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार झालंय. त्यामुळे निकोबार बेट, बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान आणि उत्तर अंदामानाच्या काही भागात मान्सूनचा परिणाम दिसून येतोय. पुढील 48 तास हा परिणाम दिसून येणार आहे.
1 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार :
मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. सध्या मान्सूनसाठी वातावरण पोषक असून जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ, नंतर 10 जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सून येईल, असा अंदाज वर्तविला आहे.