कार्तिक त्यागीची दमदार खेळी; किंग्स एलेव्हन पंजाबवर राजस्थान रॉयल्सची मात

दुबई: आयपीएल लीगमध्ये २१ सप्टेंबर पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात राजस्थानने रोमहर्षक विजय मिळवला आहे. दुबईच्या मैदानात दोन्ही संघानी आयपीएल पर्वाची सुरुवात या सामन्याने केली होती. एका क्षणी राजस्थानने सामना गमावलाच असे वाटत असताना अखेरच्या षटकात राजस्थानच्या कार्तिक त्यागीने गोलंदाजी केली. पंजाबला विजयासाठी आवश्यक ४ धावा रोखत कार्तिकने २ विकेटही घेतले आणि हारत आलेला सामना राजस्थानने जिंकला.

पंजाबचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने उत्तम गोलंदाजी करत ५ विकेट मिळवले आणि राजस्थानला १८५ धावांवर रोखलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाकडून सलामीवीर मयांक अगरवाल (६६) आणि केएल राहुल (४९) यांनी शतकी भागिदारीने संघाला विजयाजवळ नेलं.

पुरन आणि मार्करम यांनी देखील उर्वरीत जबाबदारी पार पाडली. पण अखेरच्या षटकात राजस्थानचा युवा गोलंदाज कार्तिक त्यागीने पंजाबला विजयासाठी आवश्यक 4 धावांपैकी दोनच धावा देत दोन धावांनी राजस्थानला विजय मिळवून दिला.

Leave Your Comment