रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख (Genelia Deshmukh) तिच्या इन्स्टाग्राम रिल्ससाठी नेहमीच चर्चेत आणि तितकीच प्रसिद्ध देखील आहेय. जेनेलिया फावल्या वेळात ट्रेंडिंग असलेल्या अनेक गोष्टींवर मजेदार रील्स करत असते. यात तिचा नवरा रितेशसुद्धा सहभागी होतो आणि तिच्या या मजेदार रील्सचा भाग होतो. पण आज मात्र जेनेलियाने अशा एका व्यक्तीसोबत रील पोस्ट केलं आहे ज्याची सगळ्यांना भीती वाटते.
View this post on Instagram
जेनेलियाने केलेल्या कामगिरीसाठी तिची पाठ थोपटली पाहिजे असं अनेक फॅन्सना वाटतं आहे. जेनेलियाने याआधी असं धाडस केल्याचं दिसत नाही आहे. मात्र आता तिची हिम्मत एवढी वाढली की तिने खलनायक क्राईम मास्टर गोगोला रीलमध्ये समाविष्ट करून घेतलं आहे. आणि यापुढे जाऊन तिने चक्क त्यांना पाणीपुरी खायची ऑफर दिली आहे.