TOD Marathi

आलिया भट्टनंतर आता आणखी एक स्टार किड लवकरच  लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीबाबत (athiya Shetty) एक मोठी बातमी समोर येत आहे. काही वेब मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया लवकरच क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. वास्तविक, अथिया शेट्टीच्या लग्नाच्या बातम्या खुप दिवसांपासून गाजत होत्या. पण आता हे दोघे कुठे लग्न करणार याची मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अथिया आणि के एल राहुल कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये नव्हे तर सुनील शेट्टीच्या (Sunil Shetty) फार्म हाऊसवर सात फेरे घेतील आणि सात जन्माच्या नात्यात बांधले जातील. (Sunil Shetty’s Khandala farmhouse)

पिंकविलामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुलचे लग्न कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये नाही तर खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्म हाऊस बंगल्यात होणार आहे. हे दोन्ही स्टार्स कधी लग्न करणार याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलच्या(KL Rahul) कामाच्या वेळापत्रकानुसार लग्नाची तारीख ठरवली जाईल.( Athiya Shetty and KL Rahul getting married soon)

हा बंगला सुनील शेट्टीच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. त्यांनी हा बंगला अनेक वर्षांपूर्वी बांधला होता आणि अथियाच्या या बंगल्यासोबत बालपणीच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत त्यामुळेच तिला इथे लग्न करायचे आहे. अथिया आणि केएल राहुलने याच बंगल्यामद्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आथिया आणि केएल राहुल सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतात.