TOD Marathi

वयालाही लाजवेल ! ऐश्वर्या नारकर यांचे फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

संबंधित बातम्या

No Post Found

वय म्हणजे निव्वळ आकडा हे सांगणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. वयाची चाळीशी पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांचा फिटनेस एखाद्या 20 वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा आहे.

 

त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेसची आणि सौंदर्याची कायम चर्चा होत असते. सध्या काय तर त्यांच्या नव्या फोटोंची चर्चा होतेय. हे फोटो पाहून तुम्हीही व्वा, अप्रतिम असंच म्हणाल.

 

ऐश्वर्या सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय असून त्या कायम त्यांचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यामध्येच आता त्यांनी साडीतील त्यांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो कुणालाही वेड लावतील.

 

ऐश्वर्या यांनी पन्नाशीचा टप्पा ओलांडला आहे, त्या 52 वर्षांच्या आहेत, यावर हे फोटो पाहून क्षणभरही विश्वास बसत नाही. त्यांच्या एक एक अदा बघण्यासारख्या आहेत.

 

गुलबट रंगाच्या साडीमध्ये त्यांनी शेअर केलेल्या फोटोंत त्यांचं रूप जास्तच खुलून आलं आहे. चेहºयावरचं हास्य तर प्रमात पाडणारं आहे. सध्या त्यांचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

 

त्यांच्या या फोटोंवर चाहतेही फिदा आहेत. दुनिया बनानेवाले ने भी इतनी इंतहा कर दी, सारी कायनात की खुबसूरती आप में भर दी सारी…अशी कमेंट एका चाहत्यानं केली आहे.

 

ऐश्वर्या यांची कारकीर्द बरीच मोठी आहे. अनेकवर्ष टीव्ही मालिकांमध्ये काळ गाजवल्यानंतर नाटकातून सुद्धा अनेक सुंदर भूमिका त्यांनी केल्या आहेत.