TOD Marathi

Actor अमिर खान – किरण राव यांनी परस्पर संमतीने घेतला Divorce चा निर्णय ; मनोरंजन क्षेत्रात खळबळ

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 जुलै 2021 – बॉलिवूडमधील परफेक्टनिस्ट म्हणून ओळख असणारा अभिनेता अमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी घटस्फोटचा निर्णय घेतला आहे. अर्थात हे दोघेही विभक्त होणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. घटस्फोटाचे ठोस कोणतंही कारण त्यांनी सांगितलं नाही. हा घटस्फोट परस्पर संमतीने घेतला आहे, असे समजत आहे.

आमिर आणि किरण मागील पंधरा वर्षापासून पती- पत्नी म्हणून सोबत आहेत. घटस्फोटाचा निर्णय दोघांनी परस्पर संमतीने घेतला आहे, असे बोलले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे आमिर खानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

आमिर आणि किरण हे दोघे २८ डिसेंबर २००५ रोजी विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर त्यांनी १५ वर्षे संसार केला. मात्र, आता या दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतलाय. घटस्फोटाबाबत दोघांनीही ऑफिशियल निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

या निवेदनात असे म्हंटले आहे कि, आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यात आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण समोर आलेले नाही.

२०११ साली किरण रावने सरोगसीच्या आधारे मुलाला जन्म दिला. या दोघांना नऊ वर्षांचा आझाद नावाचा मुलगा आहे. त्याअगोदर आमिर खानने १९८६ मध्ये अभिनेत्री रिना दत्ताशी लग्न केलं होतं.

या दोघांना जुनैद नावाचा मुलगा आणि आयरा नावाची मुलगी आहे. तर, २००२ साली या दोघांनी घटस्फोट घेतल्याने दोन्ही मुलांचा ताबा रिना दत्ताला मिळाला.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज