‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत सध्या यश आणि नेहाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मालिकेत यशचा मित्र म्हणजेच समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade latest post) साकारताना दिसतो. यश इतकच प्रेम समीरवर देखील प्रेक्षक करताना दिसतात. संकर्षण मालिकेसोबत नाटकात देखील काम करताना दिसतो. सोशल मीडियावर देखील तो तितकाच सक्रीय असतो. नुकताच तो आईसोबत भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेला होता.
याबद्दल त्याने एक मजेशीर पोस्ट शेअर केलीय. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. नाटकाचे दौरे असो वा कुठली नवीन सुचलेली एखादी कविता तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. किचन कल्लाकार या शोमध्ये देखील त्याच्या विनोद बुद्धीनं नेहमीच तो प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो. आता या सगळ्या कामाच्या व्यापातून वेळ काढत तो घरातल्यांसोबत वेळ घालवत असल्याचे दिसत आहे.