मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर ती सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच आता प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या घरी आलेल्या नव्या पाहुण्याची ओळख चाहत्यांसोबत करुन दिली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सक्रीय असलेली प्राजक्ता बऱ्याचदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफशी निगडीत गोष्टी, घडामोडीदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच ती तिच्या आजी-आजोबांना घेऊन सिनेमा पाहायला गेली होती. त्यानंतर आता तिच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. या नव्या पाहुण्याला तिने ‘शेपूट’ असं मजेशीर नावदेखील दिलं आहे.