“… मी नॉनव्हेज खाल्लं आहे”; दगडुशेठचं पवारांनी घेतलं बाहेरूनच दर्शन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भिडे वाड्यासह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी बाहेरून गणपतीचे दर्शन घेतलं. यावरून राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं . याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आता खुलासा करत, शरद पवार यांनी नॉनव्हेज खाल्ले असल्यानं मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

दगडूशेठ मंदिराशेजारील गृह विभागाची जागा मंदिर ट्रस्टला देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी शरद पवारांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी मंदिराची पाहणी केली. यावेळी भिडे वाड्यालाही त्यांनी भेट दिली. ते दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, मंदिरात न जाता त्यांनी बाहेरूनच गणपतीचे दर्शन घेतले.

Leave Your Comment