मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झालं.
आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आमदार रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे, त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.
लटके हे १९९७ पासुन तिनदा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सलग दोनदा ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून गेले.