ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन!

मुंबई: एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.

अनेक वेळा आर्यन खानची जामीन याचिका फेटाळण्यात आली होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं मुकूल रोहतगी यांनी सांगितलं आहे. अनेक प्रयत्नांनंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाली आहे.

Leave Your Comment