टिओडी मराठी, पुणे, दि. 16 जुलै 2021 – सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे अनेक लोक पर्यटनस्थळी फिरायला जात आहेत. त्यामुळे गर्दी होत आहे. असंच लोणावळ्यातील पर्यटनस्थळी गर्दी वाढल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू केले आहे.
पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. तसेच, वाहनांना धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात बंदी घातली आहे. लोणावळ्यातील पर्यटनस्थळी मागील काही दिवसांपासून नागरिकांची गर्दी होत आहे, असे निदर्शनास आले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून ही नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे आजपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नवीन नियम लागू केले आहेत.
लोणावळ्यातील भुशी धरण तुडुंब भरले असून पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे, असे म्हणताच हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यामध्ये गर्दी केली. हाच प्रत्यय दरवर्षी येतो.
या दरम्यान, पर्यटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव केला आहे. पण, नियमांची एैशीतैशी करून पर्यटक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचत असतात.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करून नये. नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते. पण, त्यांच्या या आवाहनांकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत होते, असे आढळले.
लोणावळ्यामध्ये शनिवार आणि रविवार रोजी तर हजारो पर्यटक दाखल होत असतात. लोणावळ्यातील पर्यटनस्थळी याच पार्श्वभूमीवर 144 कलम लागू केले आहे. पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.
त्याचबरोबर धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास बंदी घातली आहे. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केलं आहे.
‘या’ परिसरात वाहनांना बंदी :
भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहणार आहेत.