TOD Marathi

कोयनेतून होणार 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग, कोयनाकाठच्या गावांना इशारा

संबंधित बातम्या

No Post Found

जून महिना पावसाविना कोरडा गेला. मात्र जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. (Heavy Rain in Maharashtra) काही भागांत पावसाचा जोर वाढला असल्याने नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे विविध नद्यांसह धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान कोयना धरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.
आज सायंकाळी 5 च्या सुमारास कोयना धरण पायथा विद्युत गृहातून 1, 050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सोडण्यात येणार आहे. (1050 cusecs water discharge Koyna Dam) त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसेच प्रशासनाने या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही केलं आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात आणखी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील मुंबईसह कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना गेल्या 24 तासात पावसाने झोडपून काढले आहे. मुंबईत, नाशिक आणि पुण्यात ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे. (Red alert in Pune, Nashik and Mumbai)
दरम्यान, राज्यात कोकण आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात पाऊस सुरुच आहे. या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच मुंबईत दमदार पाऊस पडत आहे. मुंबईतही सरासरीपेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद झाली.