Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
शिंदे, फडणवीस, गवळींसह जाधवांवर ठाकरेंनी साधला निशाणा

TOD Marathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray addressed a public meeting in Chikhali of Buldana district) शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना मी मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने एका क्षणात शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं, याबद्दल त्यांनी सांगितलं. हे सांगत असताना पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने पिक विमा देण्यास भाग पाडू, असं म्हणत एक प्रकारे पीक विमा कंपन्यांना इशारा दिला. यादरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार भावना गवळी, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह शिंदे गटाच्या आमदार खासदारांवर जोरदार निशाणा साधला. (Shivsena UBT Chief Uddhav Thackeray crticized CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis, and leaders of Shinde group)

ज्यांना स्वतःचे भविष्य नाही, जे स्वतःचे हात दुसऱ्यांकडे दाखवतात ते आमचं भविष्य ठरवणार का? असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यासोबतच देशात हेलिकॉप्टरने जाणारा दुसरा कुठला मुख्यमंत्री बघितला आहे का? हेलिकॉप्टरने जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, अशी योजना नवीन लागेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची एक जुनी क्लिप दाखवत दुसऱ्या सरकारचं अभिनंदन करताना आता तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही ही गोष्ट करून दाखवा, असं म्हणत एक प्रकारे खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना दिलं. आणि देवेंद्र, जनाची नाही तर मनाची ठेवा असाही उल्लेख त्यांनी केला. अब्दुल सत्तार यांच्याबद्दल बोलत असताना त्यांचा उल्लेख अब्दुल गटार असा केला आणि तो जाणीवपूर्वक करत असल्याचेही सांगितले. (Uddhav Thackeray on Abdul Sattar)

इथल्या खासदार आमदारांना तुम्ही अनेक वर्ष निवडून दिलं. मात्र, त्यांनी गद्दारी केली, त्यांना धडा शिकवा, असं म्हणत स्थानिक आमदार संजय गायकवाड, संजय रायमुलकर आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली होती. त्यानंतर ते फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचा दाखला देत ‘ताईंनी मोदींना राखी बांधली आणि ईडीवाले गप्प बसले’ एकंदरीत ‘भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना’ असं सुरू असल्याचं म्हटलं आहे. (Uddhav Thackeray on MP Bhavana Gawali)

भाजपवर देखील उद्धव ठाकरेंनी चांगलंच तोंड सुख घेतलं. भाजपा आता आयात पक्ष आहे, हा पक्ष आहे की चोरबाजार? असं म्हणत भाजपवर त्यांनी बोचरी टीका केली. भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर टीका करत असताना, केंद्रीय नेतृत्वावर देखील त्यांनी टीका केली.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

  • ज्याला स्वतःचे भविष्य नाही तो आमचं भविष्य ठरवणार?
  • आज नवस फेडायला आणि गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते
  • दसऱ्यालाच ठरवलं होतं मुंबईबाहेर पहिली सभा बुलढाण्याला होईल
  • गद्दारी गाडायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे
  • पुढची वाटचाल लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने करावी लागेल
  • गद्दारांना आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला जावं लागतं
  • आज जुने चेहरे दिसत नाहीत, ते जुने फसवे होते
  • ताईंनी मोदींना राखी बांधली आणि इडीवाले गप्प बसले
  • भाजपा आता आयात पक्ष, हा पक्ष आहे की चोरबाजार?
  • मी मुख्यमंत्री असतो तर महिलांविषयी चुकीचं बोलणाऱ्याला लाख मारून घालून दिला असता
  • 92-93 ला मुंबई शिवसैनिकांनी वाचवली
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही
  • अब्दुल सत्तार यांचा अब्दुल गटार असा उल्लेख
  • सुप्रिया सुळे यांना राजकारणात शिवीगाळ कसं काय करू शकतात?
  • बाळासाहेबांचा शिवसैनिक शेपट्या घालून बसत नाही
  • महापुरुषांचा, महिलांचा अपमान तरी तुम्ही शेपट्या घालून कसं बसता?
  • देवेंद्र, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा
  • शिव्या खाऊन पंतप्रधानांचे पोट भरत असेल, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय?

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज