‘या’ कारणामुळे आजचा IPLचा सामना रद्द! ; RCB आणि KKR यांच्यात होणार होता सामना

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 मे 2021 – कोरोनामुळे आजचा IPLचा सामना रद्द केला आहे. कारण, कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)च्या संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोलकाता नाइट रायडर्स संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. यासह आणखी काही खेळाडूंची तब्येत बिघडली. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)चा संपूर्ण संघ विलगीकरणात गेला आहे. आयपीएलच्या IPL 2021 आजच्या सामन्याची वेळ बदलली आहे.

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात सामना होणार होता. हा सामना आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर येथे होणार होता. कोलकोताचा संपूर्ण संघ व सपोर्ट स्टाफ देखील आता विलगीकरणात गेल्यानं आजचा सामान होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. यादरम्यान, बीसीसीआयकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एका एएनआय वृत्तसंस्थेनं अशी माहिती दिली आहे कि, कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)च्या संघातील वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झालीय. तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स Pat Cummins हि कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील एका वृत्तसंस्थेनं दिलीय.

कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)च्या संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने देखील आजचा सामना खेळण्यास नकार दिलाय. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असं बोललं जात आहे.

Please follow and like us: