‘ज्यांनी लस घेतली, त्यांनी मास्क लावायची आवश्यकता नाही’ ; ‘या’ देशाची घोषणा

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 मे 2021 – आता ज्यांनी ‘ज्यांनी लस घेतली, त्यांनी मास्क लावायची आवश्यकता नाही’ अशी घोषणा अमेरिका देशानं केली आहे. लोकांच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी आणि लसीकरणाला अधिक प्राधान्य देण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.

मागील वर्षांपासून जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले. कोरोनावर उपचार करण्याची पद्धत आदी तितकी अवगत झाली नव्हती. म्हणून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. यासाठी प्रतिबंध करणे हाच उपाय मानून त्याप्रमाणे खबरदारी घेण्यात आली. मात्र, आता अनेक देशांनी कोरोनावर लस तयार करण्यावर भर दिला असून त्याप्रमाणे सर्व निकष पूर्ण करून त्या लस लोकांना दिल्या जात आहेत.

मात्र, काही देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अमेरिकेत तर तिसऱ्या लाटेनही थैमान घातलं होतं. त्यामुळे नागरिकांचं जगणं मुश्कील केलं होतं. आता अमेरिकेनं लसीकरणावर अधिक प्रमाणात भर दिला असून त्यानंतर अमेरिकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे मागील महिन्यांपासून अत्यंत गंभीर परिस्थिती पाहायला मिळत होती. जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या अमेरिकेत असल्याचे चित्र होतं. पण, आता अमेरिका इस्रायलनंतर कोरोनावर विजय प्राप्त करत आहे. कारण, तेथील कोरोना रूग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे.

अमेरिकेच्या सरकारने नागरिकांना गर्दीचे ठिकाण सोडून इतर ठिकाणी फिरताना मास्क वापरण्याची गरज नाही, असे स्पष्ट केलं आहे. ज्या लोकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केलं आहे, अशा लोकांनी शहरात कुठेही फिरताना मास्क घालणं बंधनकारक नाही, असेही अमेरिकेची आरोग्य संस्था सीडीसीने स्पष्ट केलंय.

यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देखील ट्वीट करून या गोष्टीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, लसीकरण तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही वाचवण्यासाठी महत्त्वाचं ठरत आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावं. अमेरिकेत अर्ध्यापेक्षा अधिक लोकांनी कोरोना लस घेतली आहे. त्यामुळे आता अमेरिका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे.

Please follow and like us: