टिओडी मराठी, चेन्नाई, दि. 2 मे – आज तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे सत्तांतर झाले आहे. राज्यातील सरकारची सूत्रे अद्रमुक पक्षाकडून द्रमुक पक्षाकडे गेलीत. द्रमुक पक्षाने येथे कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी केली होती. हा यूपीए आघाडीचा भाग मानला जातोय. द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला तामिळनाडू राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
मात्र, द्रमुक पक्षाला एक्झिट पोलमध्ये जेवढ्या प्रमाणात बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविला होता. तो मात्र प्रत्यक्षात दिसला नाही. द्रमुकला दोन तृतीयांश बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तविला होता. पण, सध्या द्रमुकला मिळालेले यश माफक स्वरूपाचे आहे.
भाजपने या तामिळनाडू राज्यामध्ये सत्तारूढ अद्रमुक पक्षाशी युती केली होती. पण, त्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागलं आहे. भाजपचे या राज्यातील अस्तित्व याही वेळी नगण्य राहिले. तथापि, अद्रमुक आघाडीने पराभूत होऊनही येथे जी लक्षणीय लढत दिलीय, ती कौतुकास्पद ठरलीय. जयललितांच्या निधनानंतर हा पक्ष येथे प्रथम सार्वत्रिक निवडणुकीला सामोरा गेला.
पक्षाच्या दोन गटांत मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी एकजूट घडवून आणली होती. उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील दुसरा गटही या निवडणुकीमध्ये पलानीस्वामी यांच्या गटाशी एकरूप होऊन लढला होता. तथापि, सतत दहा वर्षे सत्तेवर असलेल्या अद्रमुक पक्षाला ऍन्टिइकंबन्सीचा मोठा फटका सहन करावा लागलाय.
एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर द्रमुक पक्षाची सारी सूत्रे त्यांचे पुत्र स्टॅलिन यांच्या हाती गेलीत. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही पहिली स्वतंत्र निवडणूक होती. आता स्टॅलिन हे राजकीय संघर्षानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहेत. या निवडणुकीमध्ये अभिनेते कमल हसन यांनीही आपले नशिब अजमावले आहे. पण, ते एकटे वगळता त्यांच्या पक्षाला अन्य कोणतीही जागा मिळालेली नाही.
कमल हसन यांचा या निमित्ताने राज्याच्या विधानसभेमध्ये प्रवेश झालाय. काही मतदारसंघामध्ये या पक्षाच्या उमेदवारांना लक्षणीय मते मिळाली असली तरी मोठा राजकीय फोर्स निर्माण करण्यात कमल हसन यांना अपयश आलंय.
सुपरस्टार रजनीकांत या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण, प्रकृतीचे कारण देत त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कमल हसन यांच्या कामगिरीकडे अनेकांच्या नजरा लागल्या. पण, त्यांना येथे फार चमकदार कामगिरी नोंदवता आलेली नाही.
More Stories
‘अग्निपथ’साठी लवकरच राबवली जाणार भरती प्रक्रिया
सुशीलकुमार शिंदे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत? दिल्लीत महत्वाची बैठक
वरुण गांधींचा भाजपला घरचा आहेर; ‘या’ विषयावर केले भाष्य