समाधान आवताडे यांचा विजय ‘महाविकास आघाडी’च्या थोबाडीत मारल्यासारखा : चंद्रकांत पाटील

टिओडी मराठी, पुणे, दि. 2 मे – पंढरपूर मंगळवेढा या विधानसभेसाठीच्या पोटनिवडणुकीत आज (2 मे) भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करून विजय मिळविला आहे. यावरून भाजपचे नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला खोचक टीका केली आहे. त्यांनी असे म्हंटले आहे कि, समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे. पाटील पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

देशात 5 विधानसभा निवडणुकीच्या निकालासोबतच पंढरपूर मंगळवेढा या विधानसभेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरुय. मात्र, सध्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालानंतर येथे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचाच विजय होण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत या जागेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र मैदानात उतरले होते. तिन्ही पक्षांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विजयासाठी प्रयत्न केला होता. मात्र, सध्या मतमोजणीत पंढरपूरमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी विजय मिळविला आहे. त्यावर भाष्य़ करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत टीका केली.

समाधान आवताडे याचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हंटलं आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसच्या राजकीय अस्तित्वाबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी पाच राज्यांच्या निकालानंतर देशात काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झालाय, अशी देखील टीका केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप यानंतरच्या सर्व निवडणुकीत संघटनात्मक पद्धतीने काम केले जाणार आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवत असतात. पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झालाय. यापुढच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार आहे.

दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा या जागेसाठी अजूनही मतमोजणी सुरु आहे. सध्या हाती आलेल्या ताज्या निकालानुसार मतमोजणीच्या 35 व्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे हे 4395 मतांनी आघाडीवर असून त्यांना एकूण 101607 मते मिळाली आहेत. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना आतापर्यंत 97212 मते मिळाली असून अजूनही येथील मतमोजणी सुरु आहे.

Please follow and like us: