TOD Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (NCP Chief Sharad Pawar admitted in hospital) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गरजे यांच्याकडून पत्रक काढून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याचे पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढील तीन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतील. 2 नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज मिळू शकेल. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ब्रिच कँडी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, अशा सूचना देखील या पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे चार आणि पाच नोव्हेंबरला शिर्डीत होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला देखील उपस्थित राहणार आहेत.