West Bengal Election 2021 Updates : ममता बॅनर्जींनी जिंकली नंदीग्रामची लढाई; चुरशीच्या लढतीमध्ये केला सुवेंदू अधिकारींचा पराभव

टिओडी मराठी, कोलकाता, दि. 2 मे – अख्या देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची लढाई जिंकली आहे. तर, चुरशीच्या लढतीमध्ये सुवेंदू अधिकारींचा पराभव झाला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या विश्सासातले समजले जाणारे व तृणमूलच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारे नेते शुवेंदू अधिकारी यांनी मागील डिसेंबर महिन्यात ममता बॅनर्जींना मोठा झटका दिला होता. त्यांनी 11 आमदारांसह भाजपची वाट धरली होती. तेव्हा या निवडणुकीमध्ये शुवेंदू अधिकारी यांची चर्चा सुरू झाली होती.

अख्या देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी या निवडणुकीमध्ये भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते.

मागील काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हि निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती, हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी यांनी भाजपसमोर ठामपणे लढल्या.

सध्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही?, याबाबत शंका निर्माण होत आहे.

कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला आहे, असेच म्हणावे लागत आहे.

Please follow and like us: