टिओडी मराठी, कोलकाता, दि. 3 मे 2021 – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व ताकद पणाला लावणाऱ्या भाजपाला हरवून तृणमूल काँग्रेसने विजय मिळविला. जिकल्यानंतर त्यांनी मतदारांचे आभार मानले. आता पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा असून तो साध्या पद्धतीने पार पडणार आहे. तृणमूलचे वरिष्ठ नेते व मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी ही माहिती दिलीय.
ममता बॅनर्जी आज (सोमवार) रात्री ७ वाजता राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत. तसेच सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर बुधवारी ५ मे रोजी त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते पार्थ चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय.
या दरम्यान, तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत हॅटट्रिक केलीय. त्यामुळे तिसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार आहे. २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने २१३ जागांवर विजय मिळवला आहे.
तृणमूलची २०२१ च्या निवडणुकीतील कामगिरी २०१६ च्या कामगिरीपेक्षा अतिशय सरस ठरली आहे. सन २०१६ मध्ये तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. तसेच या निवडणुकीमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावणाऱ्या भाजपला केवळ ७७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप विरोधी बाकावर असेल, असा अंदाज आहे.
More Stories
उपरणं, हातात धागा अन् माथी टिळा; आमिरने केली पूजा…
Shraddha Murder Case: “…तर आज माझी मुलगी जिवंत असती, श्रद्धा वालकरच्या वडिलांची पत्रकार परिषद
हिमाचल प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर? सत्तास्थापनेसाठी ‘हे’ मराठी नेते शिमल्यात