टिओडी मराठी, लातूर, दि. 1 मे 2021 – महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर देवस्थान सभागृह येथील जंबो कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले आहे.
या जंबो कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना विनामूल्य सेवा दिली जाणार आहे. या काळात मानवतेच्या दृष्टीने सर्वांनी मिळून कोरोना विरुद्धची ही लढाई एकत्र लढल्यास त्यावर नक्की मात करु विश्वास देखील व्यक्त केला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा आयुक्त अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, विरोधी पक्षनेते दिपक सूळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे जंबो कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. तसेच यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे लक्ष दिले आहे. या जंबो कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोना रुग्णावर उपचार केले जातील.
More Stories
देवेंद्र फडणवीस १० तासांनी मुंबईत परतले, आज मोठा निर्णय होणार?
अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
दहावीच्या निकाल जाहीर; निकालात मुलींची बाजी, तर राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका