पश्चिम बंगालमध्ये जखमी वाघिणीच्या पंजाने ‘चौकीदार’ झाला घायाळ: राजू शेट्टी

टिओडी मराठी, दि. 2 मे – पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी भाजपने भाजपशासित राज्याचे सर्व आजी-माजी मुख्यमंत्री, खासदार आमदार मैदानात उतरवले होते. तरीही भाजप या ठिकाणी सत्ता मिळवू शकलेली नाही. भाजपने तृणमूल कॉंग्रेसला हरवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास बंगालच्या निवडणुकीसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखा पेहराव तयार केला होता. तरीही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भाजपचा पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर आता नेते नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी फेसबूकवरून ममता यांचं अभिनंदन केलं आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया :
जख्मी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ ! पश्चिम बंगाल मधील निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल
#ममता #दीदींचं #अभिनंदन !
त्यांनी आता देशातील भाजप विरोधी आघाडीचं नेत्तृत्व करावं. असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

https://www.facebook.com/photo.php?fbid=305063094315109&set=a.252946999526719&type=3

Please follow and like us: