TOD Marathi

Savitribai Phule Pune University: ३० डिसेंबर पर्यंत मुलाखती पुर्ण करा

संबंधित बातम्या

No Post Found

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत (Savitribai Phule Pune University Ph.D entrace exam) पीएचडी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सुचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. मुलाखतीसाठींची मार्गदर्शक तत्त्वेही विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आली व ३० डिसेंबर पर्यंत मुलाखती घ्याव्यात, असे देखील विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

पीएचडी प्रवेश परिक्षा विद्यापीठाकडून घेण्यात आली व त्याचा निकाल देखील जाहीर करण्यात आला. याची गुणवत्ता यादीही प्रसिद्ध झाली. अर्थातच या प्रक्रियेचा एक टप्पा पार पडला व त्यामुळे मुलाखती देखील पार पडाव्यात, याबाबत विद्यापीठाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली, (Guidelines issued by University) त्यानूसार संशोधन केंद्राकडून मुलाखती घेण्यासाठी कोणत्या योजना कराव्यात आणि विद्यार्थ्यांनी मुलाखती कशा द्याव्यात, या बाबत सगळी माहिती विद्यापीठाच्या वेबासाईटवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. पीएचडी संशोधनाच्या केंद्रांनी गुणवत्ता यादी व मुलाखतींचे वेळापत्रक आपल्या केंद्रांवर प्रसिद्ध करावे. पीएचडी प्रवेशाची मुलाखत केवळ संशोधनाच्याविषयी संबंधित असावी, आणि पीएचडी संशोधनाच्या मुलाखती घेणारी समिती, विद्यापीठांच्या कुलगूरुंना माहिती देऊन व परवानगी घेऊनच नेमायची. अशा सुचना विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आल्या.

मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचनाः

  • मुलाखतीत चर्चा केले जाणारे मुद्दे केवळ संशेधनाच्या विषयाशी संबंधित असावेत.
  • मुलाखतीच्या वेळी विद्यार्थ्याने सर्व शैक्षणिक कागदपंत्रांच्या मुळ प्रती सोबत ठेवाव्यात.
  • मुलाखतीच्या आधी एक तास विद्यार्थ्याने मुलाखत स्थळी उपस्थित रहावे.
  • मुलाखत ज्या दिवशी ठरेल त्याच दिवशी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहाणे बंधनकारक असणार आहे.
  • पीएचडी प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना केवळ एकदाच मुलाखत देता येणार आहे.