टिओडी मराठी, दि. 1 मे 2021 – देशात करोना रुग्णांची संख्या वाढताना गुड न्यूज समोर आली आहे. रशियातून स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचलीय. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणाराय. देशामध्ये आजपासून १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झालीय. मात्र, काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येताहेत. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. त्यामुळे आता लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.
सध्या भारतात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जातेय. स्पुटनिक व्ही सोबत भारतात तिसरी लस उपलब्ध झालीय. भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जातोय. स्पुटनिक व्ही लसीची परिमाणकारकता ९२ टक्के आहे.
स्पुटनिक व्ही लस एस्ट्राजेनेकाच्या लससारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र, या लसचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसचे दोन डोस वेगवेगळे असल्याने करोनावर दूरगामी परिणाम दिसताहेत. या लसला आतापर्यंत ६० हून अधिक देशांनी मान्यता दिलीय.
‘स्पुटनिक व्ही सर्वाधिक प्रभावी लस असून त्याचबरोबर करोनाच्या नव्या विषाणूवरही मारक ठरत आहे. या लसीचं देशात लवकरच प्रोडक्शन सुरु होणार आहे. तसेच वर्षाकाठी ८५० दशलक्ष डोस तयार करण्याचा मानस आहे.’, असे रशियाच्या राजदूतांनी सांगितलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या चर्चेनंतर पंतप्रधान यांनी ट्विटरवरून पुतिन यांचे आभार मानले होते. तसेच, दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितलं होतं.
भारतात मागील दोन महिन्यांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत अधिक वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस यांचा तुटवडा जाणवताना जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केलाय.
अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं आहे. त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतलाय.
The first lot of Sputnik V vaccines from Russia arrive in Hyderabad#COVID19 pic.twitter.com/uMW0AtM2JD
— ANI (@ANI) May 1, 2021
More Stories
मुस्लिम देशांनी भारताची केली कोंडी; मोहम्मद पैगंबर वादग्रस्त वक्तव्याचा ‘या’ देशांकडून निषेध
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट?; कलम 144 लागू
जगप्रसिध्द जॉनी-एम्बर मानहानीच्या खटल्यात जॉनी डेप विजयी, निकालाचे जगभरातून स्वागत