धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला; म्हणाले, उशिरा का होईना जाग आली…

टिओडी मराठी, बीड, दि. 1 मे 2021 – ‘बीड जिल्ह्यात माजी पालकमंत्र्यांनी अधिक लक्ष देणं आवश्यक होतं. पण, उशिरा का होईना त्यांना कोविड परिस्थितीवर जाग आलीय. आता त्यांनी केंद्राकडे लससाठी विचारणा करावी, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना हणाला आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘आपल्या जिल्ह्यात माजी पालकमंत्र्यांनी अधिक लक्ष देणं आवश्यक होतं. पण, उशिरा का होईना त्यांना कोविड परिस्थितीवर जाग आलीय, आता उशिरा का जाग आली? असं म्हणता येत नाही. त्यांनी ज्या सूचना केल्या त्याची अधिक काळजी घेऊ. मात्र, आपणही केंद्रात सत्तेत आहात. त्यामुळे बीड जिल्ह्याला अधिक लस कशा मिळतील? यासाठी त्यांना जाग येणं गरजेचं आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हंटलं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘1 मे रोजी दुसरा डोस उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे. तो शब्द शासनाने जनतेला दिलाय, तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र शासनाच्यावर जबाबदारी टाकून जमणार नाही. राज्याचे लसीकरण, रेमडेसीवीर इंजेक्शनचे ऑडिट आणि दररोज मााहिती दिली पाहिजे. अधिक लसीकरण केंद्र कमीतकमी अवधी हे सूत्र करावे लागेल. लसींच्या उत्पादन करणे, साठा बनवणे, तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल, अशी सूचना देखील पंकजा मुंडे यांनी केली होती.

Please follow and like us: