जाणून घ्या, कोरोनाचे नवे रूप आणि म्युटेंटचे काय आहेत धोके?

ऑनलाईन टीम- देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या फैलावचा धोका वाढलाय. जवळपास 5 महिन्यांनंतर एका दिवसामध्ये भारतात 50 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत. जी आपल्याला 2020 च्या संकटाच्या वेळेची आठवण करून देताहेत. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत अनेक तथ्य आहेत, ते भयानक आहेत. भारतातील कोरोनाचे म्युटेंट व नवे रूप याचा शोध घेणे आवश्यक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे सांगितले होते की, कोरोनाचे नवे रूप भारतात सापडले असून काही राज्यांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आढळले आहे. कोरोनाचे हे नवे रूप देशात कोठे आढळले? आणि ते किती धोकादायक आहे, हे आपण आता जाणून घेऊया.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलंय. ज्यात देशातील 10 प्रयोगशाळांतील निकाल जिनोम स्किवेंसिंगच्या आधारे जाहीर केलंय. यानुसार कोरोना विषाणूचे 3 नवे प्रकार भारतात सापडलेेत. यात ब्रिटनमधील कोरोना विषाणू, दक्षिण आफ्रिका देशातील कोरोना आणि ब्राझिलियनचा कोरोना विषाणू यांचा समावेश होतोय.

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे सरकार पुन्हा संकटात सापडलं आहे. सध्या देशात सुमारे 771 प्रकरणे कोरोनाच्या नवी रूपांशी संबंधित आहेत. वेगवेगळ्या प्रयोगशाळांत सुमारे 10 हजार सकारात्मक नमुन्यांची चाचणी घेतलीय. त्यापैकी 771 प्रकरणे नव्या रूपांत आढळलीत. त्यापैकी, यूकेत सर्वाधिक प्रकरणे आहेत, ज्यांची संख्या 736 एवढी आहे. तर, दक्षिण आफ्रिका देशातील 34 रूपे व ब्राझिलियन प्रकारातील 1 प्रकरणे उघडकीस आली आहेत.

कोणत्या राज्यांत आहे अधिक संकट?
पंजाब राज्यामध्ये कोरोनामधील यूके व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे नोंदविली गेलीत. येथे याची एकूण 336 प्रकरणे आढळलीत. तर तेलंगणा, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात राज्यामध्येही यूकेच्या कोरोनाच्या प्रकारांची प्रकरणे आढळलीत.

याऐवजी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही दक्षिण आफ्रिकेतील प्रकार आढळलेत. ब्राझिलियन प्रकार सापडल्याची घटना महाराष्ट्रात आढळलीय.

आतापर्यंत भारतात कोरोनाची नोंद झाली असून ती सार्स-कोव्ही -2 प्रकारातील होती. परंतु जे 2 नवे वेरिएंट सापडलेत, याविषयी अधिक संशोधनात्मक माहिती मिळविली जातेय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, असे म्युटेंट रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात. तसेच जास्त संसर्ग पसरवितात. हे दोन म्युटेंट जवळपास 20 टक्के प्रकरणांत आढळलेत. म्हणून चिंता वाढतेय. या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पुन्हा चाचणी-ट्रॅक व उपचाराचे धोरण अवलंबविण्याचे निर्देश दिले आहेत.

Please follow and like us: