दिलासादायक!; भारतात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत होतेय घट

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 मे 2021 – सध्या भारतात कोरोना लसीकरण मोहिमेला बऱ्याच ठिकाणी सुरुवात केली आहे. तरीही अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांत पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित केला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. देशातील प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. पण, आता काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर येतंय. सध्या भारतात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत आहे.

देशात मागील 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत घट झाली आहे. 24 तासात सुमारे 3 लाख 68 हजार 147 कोरोनाग्रस्त रूग्ण आढळले आहेत. मृत पावणाऱ्यांची संख्याही काही प्रमाणात कमी झाली आहे. 24 तासात एकूण 3 हजार 417 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत आहेत, असे आढळत आहे.

मागील 24 तासात देशात 3,00,732 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यासह सध्या भारतात एकूण 34 लाख 13 हजार 642 इतकी सक्रिय रूग्णसंख्या आहे.

भारतात कोरोनामुळे मृतांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा अगोदरच पार केलाय. महाराष्ट्र सरकारने विचार कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलून लाॅकडाऊन घोषित केलाय.

त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन 15 मे पर्यंत वाढविला आहे. पण, केंद्र सरकारने लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापर करावा, असा सल्ला सर्व राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रासह दिल्लीत लाॅकडाऊनची घोषणा केली आहे.

देशासह पुण्यातही कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या ही पुणे शहरात आहे. काल पुण्यात दिवसभरात 4 हजार 044 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की? अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Please follow and like us: