West Bengal Election Updates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या ममता बॅनर्जी यांना विजयाबद्दल शुभेच्छा!!

टिओडी मराठी, औरंगाबाद, दि. 2 मे – आता पश्चिम बंगालच्या विधानसभेचे निकाल काही वेळात स्पष्ट होणार आहेत. पण, सध्या ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन विजय निश्चित केलाय. त्यामुळे भाजपच्या मोठ्या प्रचार यंत्रणेला धक्का देत ममता बॅनर्जी यांनी त्यांचा विजय निश्चित केलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ममता बॅनर्जी यांना फोन करून विजयाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

निश्चित झालेल्या विजयामुळे ममता बॅनर्जी यांना राजकीय क्षेत्रातील मोठ्या नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, असे दिसत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ममता बॅनर्जींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसने 207 जागांवर आघाडी घेतली असून तर भाजप 82 ठिकाणी आघाडीवर आहे. तर, थोड्याच वेळात ममता बॅनर्जी पत्रकार परिषद घेणार आहेत, असे समजत आहे.

Please follow and like us: