Belgaum Lok Sabha by election Updates : भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय; तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा पराभव

टिओडी मराठी, बेळगाव, दि. 2 मे – बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची झाली. अखेर भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी 2903 मताधिक्य घेऊन काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा पराभव केला आहे.

आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला होता. सायंकाळी सहा वाजता मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. या निवडणुकीसाठी एकूण 18 लाख 13 हजार 566 मतदारांपैकी 10 लाख 8 हजार 601 मतदारांनी आपला मतदान केले होते.

45 फेरीअखेर मंगला अंगडी यांची आठ ते दहा हजार मतांची आघाडी होती. त्यानंतर काँग्रेस सतीश जारकीहोळी यांची आघाडी होत होती. शेवटच्या सहा फेऱ्या राहिल्या असताना सतीश जारकीहोळी हे सुमारे 400 ते 500 मताने आघाडी घेतली होती. त्यानंतर काही वेळेत अचानकपणे या निवडणुकीला कलाटणी मिळाली.

भाजपच्या मंगल अंगडी यांनी अखेर काँग्रेसवर 2903 मतांनी मात करीत विजय संपादन केला. या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार अंगडी यांनी 4 लाख 35 हजार 202 मते मिळाली तर काँग्रेसचे जारकीहोळी यांना 4 लाख 32 हजार 299 मते मिळाली आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 1 लाख 24 हजार 642 मते मिळाली आहेत.

Please follow and like us: