अजित पवारांनी साधला मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, ..तर लसीचा तुटवडा झाला नसता

टिओडी मराठी, पुणे, दि. 1 मे 2021 – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. ‘आपल्या देशात उत्पादन केलेल्या लसी देशाबाहेर पाठवायची गरज नव्हती, त्या असत्या तर बऱ्याच प्रमाणात लसीकरण पार पडलं असतं. किमान आता जेवढ्या लस बाहेर दिल्यात त्या तरी परत आणाव्यात, असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केलीय.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुणे येथे अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

‘केंद्र सरकारच्या कारभारावर जगातील माध्यमांकडून टीका होतेय. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात उत्पादन केलेल्या लस बाहेर देशात पाठवायची आवश्यकता नव्हती, त्या असत्या तर बऱ्या प्रमाणात लसीकरण पार पडलं असतं. सुरुवातीला आपल्या देशात तयार झालेली लस परदेशात द्यायची गरज नव्हती, आता आपल्याला तुटवडा भासतोय, ते झालं नसतं , असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

‘आजपासून 18 वर्षाच्या पुढे लसीकरणाची सुरुवात होत आहे. अनेक वेगवेगळ्या मागण्या होताहेत. महाराष्ट्र सरकारने 12 कोटी लस विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. सीरम संस्था व भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासाठी तयार आहे’, असेही अजित पवारांनी सांगितलं आहे.

‘उच्च न्यायालयाने देखील लसच्या किंमतीच्या बाबत निकाल दिलाय. किंमती कमी करण्यासंदर्भात काही कंपन्या मागणी करताहेत. आता एकदाच लस घेतली तरी चालते अशी बातमी आलीय. सगळं नवीन आहे, त्यामुळे नक्की काही समजत नाही. जे नवीन आहे त्याची माहिती घेतली जातेय. असंही अजित पवारांनी सांगितले आहे.

‘ऑक्सिजन साठ्यासाठी रात्री २ वाजेपर्यंत नियोजन केलं आहे. जामनगरहून ऑक्सिजन पुरवठा होत आहे का? त्याची चौकशी करत आहे. तसेच शिरूरला नवीन प्लॅन्ट टाकण्यात येणार आहे. कारखान्यांना विचारलं ऑक्सिजन तयार करता येईल का?. बहुतेक आमदार आपल्या मतदारसंघात प्लॅन्ट लावायचा निर्णय घेतील’, असेही अजित पवारांनी सांगितलं आहे.

Please follow and like us: