टिओडी मराठी, पंढरपूर, दि. 2 मे – बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले यांनीही पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीच्या 23 व्या फेरीअखेर अभिजीत बिचुकले यांना केवळ 66 मते मिळाली असून त्यांच्या या मतांची सर्वत्र चर्चा होत आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांच्यावर सुमारे 6334 मतांची आघाडी घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या चिंतेत भर पडली आहे.
… म्हणून अभिजीत बिचुकले चर्चेत राहतात
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या असून ते आपल्या वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने ते कायम चर्चेत राहत असतात. खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा आव्हान दिलं आहे.
अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी बिचुकले यांना अजूनतरी यश आलेलं नाही. ‘2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार’, असं वक्तव्यही त्यानी केलं होतं. मागील लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. यावेळी अनामत रक्कम म्हणून अभिजीत बिचुकले यांनी 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती.
More Stories
रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची निदर्शने
नवले पुलावर अपघाताची मालिका कायम, आज पुन्हा अपघात
संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश