स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने प्रेक्षकांची उत्कंठा पार शिगेला पोहचवली आहे. आता परत एकदा गौरीला जीवे मारण्याचा प्रयत्न होणार आहे. या पूर्वी जयदीपचा मुखवटा घातलेल्या अनिलने आणि मानसीने मिळून गौरीला एका कड्यावरून ढकलून दिले होते. खूप मोठ्या हल्ल्यातून वाचलेली गौरी एका जंगलात जखमी होऊन पडते. त्यानंतर ती बरी होऊन पुन्हा एकदा शिर्के-पाटलांच्या घरात प्रवेश करते.
View this post on Instagram
मानसी पुन्हा एकदा गौरीशी गोड बोलून तिला डोंगरावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न करते. मात्र, या प्रयत्नात ती स्वतःच फसते. गौरीला धक्का देत असताना मानसीचा टोला जातो आणि ती खाली पडते. पण, प्रसंगावधान राखून गौरी तिचा हात पकडते. यावेळी गौरी तिला ‘जयदीपने मला का ढकललं?’ असा प्रश्न करते. तर, तुला जयदीपने धक्का दिलेला नाही, याची कबुली मानसी गौरीला देते. गौरी मानसीला वाचवते. याबदल्यात मानसी देखील गौरीला या सगळ्यामागचं खरं सत्य सांगणार आहे. आता, खोट्या जयदीपचं सत्य समोर आल्यावर शिर्के-पाटलांच्या घरात काय नवा हंगामा होणार, याची उत्सुकता सगळ्या प्रेक्षकांना लागली आहे.