सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या; टीआरपी घोटाळ्यामध्ये लाच घेतल्याचा आरोप

ऑनलाईन टीम, मुंबई – मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)च्या अटकेत असलेले निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अडचणी आणखी वाढल्या असल्याचे समजत आहेत. या एनआयएला तपास करताना आणखी काही पुरावे हाती लागले आहेत. यात टीआरपी घोटाळ्यातील काही बाबी आहेत. या दरम्यान आता आणखी एका घोटाळ्यामध्ये सचिन वाझेचं नाव आहे, असं आता समजतंय.

’बार्क’ कडून टीआरपी प्रकरणामध्ये सचिन वाझे याने गुन्हे शाखेच्या एका पोलिस निरीक्षकाच्या मदतीने सुमारे 30 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर केला आहे. या प्रकरणातील वृत्त नुकतेच एका वृत्तसंस्थेने प्रकाशित केलंय. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या अधिकार्‍यांना त्रास न देण्याच्या अटीखाली सचिन वाझेने सुमारे 30 लाख रुपये लाच घेतली आहे, असा आरोप त्याच्यावर केला आहे.

या सर्व प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी सखोल चौकशी करणार आहे, असेही आता सांगण्यात येतंय. त्यामुळे आता सचिन वाझेच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं समजत आहे.

या सर्व प्रकरणामध्ये भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून सचिन वाझेची टोळी टीआरपी घोटाळ्यामध्ये सामील असल्याचा दावा मागील महिन्यामध्ये 15 मार्च 2021 ला केला होता. त्यानंतर आता वाझे याच्यावर ईडी नेमकी काय कारवाई करणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणाराय.

Please follow and like us: