टेस्ला भारतात कार विकायला सज्ज; पहिल्यांदा ’या’ तीन शहरांत मिळणार कार

ऑनलाईन टीम, नवी दिल्ली, दि. 11 एप्रिल 2021 – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनंतर आता सामान्य लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकर भारतात पदार्पण करणार आहे. टेस्ला लवकरच भारतात इलेक्ट्रिक कार लाँच करणार असून या कारचं नाव टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड असं ठेवण्यात आलंय.

टेस्लाची ही इलेक्ट्रिक कार भारताच्या 3 प्रमुख शहरात उपलब्ध होणार आहेत. दिल्लीत शोरूम उघडण्यासाठी कंपनी जागेच्या शोधत आहेत. तर यानंतर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येही कार विकली जाणार आहेत. तर बंगळुरूमध्ये देखील शोरूम उघडण्यात येणाराय. कर्नाटकने इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र धोरण निश्चित केलंय. त्यामुळे दक्षिण भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीला वाव मिळेल.

टेस्ला कारची आयात ही चीन मधून करण्यात येणार आहे. काही शहरांत या कार ऑनलाईन मिळतील. डिलरशिपच्या माध्यमातून या कारची विक्री होणाराय. या कारमध्ये 500 किलोमीटर पर्यंतची रेंज आणि 162 किमी प्रति तास एवढी टॉप स्पीड असणार आहे. मात्र, याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

या दरम्यान, टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी भारतात टेस्ला इंडिया मोटर्स ही उपकंपनी स्थापन केलीय.

Please follow and like us: