रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे असेल तर ’या’ क्रमांकावर संपर्क साधा; वितरणासाठी नियंत्रण कक्ष सुरु

ऑनलाईन टीम, पुणे, दि. 11 एप्रिल 2021 – पुण्यातील कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यात पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे, असं आढळतंय. या रुग्णांच्या नातेवाईकांचीही या इंजेक्शनमुळे मोठी धावपळ होतेय.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकार्‍यांनी इंजेक्शनचं वितरण सुरळीत व्हावं, यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणासाठी नियंत्रण कक्ष सुरू केलाय. कोरोनासारख्या गंभीर संकटाचा सामना करताना इंजेक्शन अभावी कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी नियंत्रण कक्ष उभारून 2 नंबर जारी केलेेत. ज्यावर कॉल करून रुग्णांचे नातेवाईकांना इंजेक्शन मिळविता येईल.

पुणे जिल्हाधिकार्‍यांनी सुरु केलेल्या नियंत्रण कक्षाचे नंबर पुढीलप्रमाणे आहेत. 020-26123371 तसेच 1077 या नंबरवर संपर्क साधून रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना ते तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल. हे केंद्र 31 मे 2021 पर्यंत सुरू ठेवणार आहे, असं जिल्हाधिकार्‍यांकडून स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने नुकतीच रेमडेसिवीर इंजेक्शनची होणारी निर्यात बंद केलीय. तसेच महाराष्ट्र राज्यात या इंजेक्शनचा तुटवडा होत आहे. अनेक ठिकाणी याचा काळाबाजार होत असल्याचं निदर्शनास आल्याने पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला आहे. पुण्यातील या उपक्रमाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जातंय. तसेच याद्वारे इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यास प्रशासनाला यश येईल, असं मत व्यक्त केलं जातंय.

Please follow and like us: