निवडणूक; पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा!

ऑनलाईन टीम, पंढरपूर – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांना पाठिंबा दिलाय. मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी याबाबत माहिती दिलीय. तसेच मनसेचे नेते भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत, असेही सांगितलं आहे.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलीय. अशात मनसेनं राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचं पारडं आणखी जड झालंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंढरपूरमध्ये जोरदार प्रचार करताहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंढरपुरात सभा घेतल्या होत्या.

यावेळी अजित पवार म्हणाले की, 5 वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना निवडून दिलं होतं. त्यांचं काम पण सुरु होतं. मात्र, काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे, भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावं, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन.

Please follow and like us: