दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर जे ज्ञानामृत देताहेत याची महाराष्ट्राला गरज नाही -संजय राऊत

ऑनलाईन टीम, मुंबई – महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या हा चिंतेचा विषय बनलाय. अशातच राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे रूग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार विरूद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पाहायला मिळतोय. त्यातच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर निशाणा साधून टीका केलीय.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर टीका करताना असं म्हटलंय की, ’प्रकाश जावडेकर दिल्लीमध्ये बसून जे ज्ञानामृत देत आहेत, त्याची महाराष्ट्र राज्याला गरज नाही. त्यांनी पुणे, मुंबईमध्ये बसावं. या ठिकाणची परिस्थिती पाहावी, त्यांचंही महाराष्ट्राशी नातं आहे.

संजय राऊत यांनी या दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केलीय. नुकतच भाजपने महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केलाय. तसेच राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. त्यावरूनच राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.

फडणवीस यांनी लॉकडाऊनला विरोध केला. पण, ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे?. उद्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली.तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार?, तेव्हा महाराष्ट्र सोडून उर्वरीत देशात लॉकडाऊन करा, असं फडणवीस मोदींना सांगतील का? असा प्रश्नही खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना विचारलाय.

Please follow and like us: