असा दूर केला ‘त्या’ कोरोनाग्रस्त रुग्णाचा एकटेपणा ; नर्सच्या भन्नाट आयडियाची चर्चा

ऑनलाईन टीम, नवी दिल्ली, दि. 11 एप्रिल 2021 – मागील वर्षभरापासून जगात कोरोना विषाणूनं थैमान घातलंय. त्याच पार्श्वभूमीवर अनेक देशांत कडक लॉकडाऊन केला होता. तुम्हाला जर कोरोना झाला तर तुम्हाला विलगीकरणात रहावं लागतं. त्यामुळे रुग्णांत एकटेपणा दिसून येतो. अशावेळी त्यांचा एकटेपणा दूर करणं, हेच आव्हान होतं. मात्र, एका रुग्णाचा एकटेपणा घालविण्यासाठी एका नर्सनं भन्नाट आयडिया लढविली.

ब्राझील देशात एका नर्सने कोरोनाग्रस्त रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी एक भन्नाट आयडिया लढवलीय. या नर्सने रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी हँडग्लोजमध्ये पाणी भरून त्याच्या हाताच्या दोन्ही बाजूला ठेवले. यातून त्या रुग्णाला दुसर्‍याचा स्पर्श देण्याचा प्रयत्न केला आहे.

नर्सने लढवलेल्या या आयडियाला एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर केलंय. तसेच तिने केलेल्या याचा फोटो देखील ट्विट करून तो हात देवाचा असल्याचं ट्विटमध्ये म्हटलंय. तसेच ही घटना ब्राझील इथल्या कोरोना वार्डातील आहे, असं त्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

आर्टिफिशियल ह्यूमन टच अर्थात मानवी स्पर्श देण्याचा या नर्सने जो प्रयत्न केलाय. त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय. या फोटोला बघून अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच कोरोनासारख्या रोगात कोणाच्या संपर्कात येता न आल्याने किंवा आपल्या परीजनांच्या सोबत राहता न येण्यामुळे बरेचसे रुग्ण एकटेपणामध्ये जीव सोडत असताना पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर नर्सने केलेल्या या आयडियाचं सर्वांनी कौतुक केलं जात आहे.

Please follow and like us: