अमेरिकेच्या ‘या’ नव्या कायद्याचा 5 लाखाहून अधिक भारतीयांना होणार फायदा

ऑनलाईन टीम – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी एक विधेयक मंजूर केलंय. ज्याचा अमेरिकेत 5 लाखाहून अधिक भारतीयांच्या नागरिकत्वाचा मार्ग मोकळा झालाय. अमेरिकन संसदेच्या खालच्या सभागृहातील प्रतिनिधींनी तयार केलेल्या विधेयकानुसार अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या स्थलांतरितांना नागरिकत्व मिळवणे सोपे होणार आहे. ‘अमेरिकन ड्रीम अँड प्रॉमिस अ‍ॅक्ट’च्या नावाखाली मंजूर केलेले हे विधेयक आहे. तसेच हे विधेयक अमेरिकेत राहणार्‍या 5 लाखाहून अधिक भारतीयांची स्वप्ने पूर्ण करणार आहे, असा अंदाज वर्तविला जात आहे.

प्रतिनिधींनी सभागृहामध्ये नुकताच अमेरिकन ड्रीम अँड प्रॉमिस कायदा 228-197 मतांच्या फरकाने मंजूर केलाय. तसेच त्यास सिनेटकडे पारित करण्यासाठी अथवा विचारार्थ पाठवला गेलाय. या विधेयकामुळे अशा लोकांना कायदेशीर देखरेखीखाली रहावे लागणाराय. तसेच त्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची चर्चा केली जात आहे. आता या कायद्यामुळे सुमारे 5 लाखाहून अधिक भारतीयांसह सुमारे 1 कोटी 10 लाख स्थलांतरितांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळणार आहे, तेही कागदपत्रांशिवाय.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शविलाय. याबाबत ते म्हणाले, काँग्रेसने हे विधेयक मंजूर करावं. त्यामुळे सुमारे 1.1 कोटी प्रवासींना देशाचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. हे अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे, सुधारणेकडे एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जाणार आहे.

खरंतर, अमेरिकेत कायदेशीर स्थितीशिवाय जगणार्‍यांची संख्या 10 दशलक्ष इतकी आहे. या नवीन कायद्याच्या अंमलातून त्यांचे नागरिकत्व लागू केले जाईल. या कायद्याचा थेट फायदा भारतातील सुमारे 5 लाख लोकांना होणाराय.

Please follow and like us: